Friday, August 21, 2020

अहंकार

 तू जाणलेला शब्द नवा 

अहंकाराचा पहारा त्याला 

परी तो शब्द सारखा 

शब्दाचा अर्थ शब्दातच राहिला 

            -  साबळे क्षितिजा 

Monday, August 10, 2020

आई

 आई तुझ्याशी बोलायचं 

राहूनच गेलं थोडं 


अस्पष्ट त्या अंधारात 

जन्म झाला माझा 


इवल्याश्या माझ्या हातांना 

तुझा आधार मिळाला 


बोबड्या माझ्या शब्दांनी 

हसू  जाणलं तुझं 


तुझ्याच स्मित हास्यानं 

मला बळ मिळालं 


डोळ्यात तुझ्या मी 

मोठी झाली 


भरून गेलं भावनांनी

नातं आपल 


आई तुझ्याशी बोलायचं 

राहून गेलं थोडं 

                             - साबळे क्षितिजा  

 

Thursday, June 18, 2020

गरीबाच गाणं

 गरिबाचं गाणं 

परिस्थितीनं शिकवावं
माणुसकीचं नातं
कधीतरी ऐकून बघ
गरिबाचं गाणं

तूच तुझे वेचलेले शब्द
अस्पष्ट भावना अन अस्पष्ट शब्द
अस्पष्ट शब्दातलं जगणं
कधीतरी जगून बघ

अंधारातल्या उजेडासाठी
शोधतोय तो दिवा
अस्पष्ट अंधाराशी
नातं तोडतोय
कधीतरी दिव्याची
गोष्ट जाणून बघ

परिस्थितीनं शिकवावं
माणुसकीचं नातं
कधीतरी ऐकून बघ
गरिबाचं गाणं
                       --साबळे क्षितिजा 

Saturday, December 7, 2019

Avyakt | Sabale Don Akshare

अव्यक्त  



बाबा , 
 तूजी परी मी ,
सोबत तुज़्या कमाताली ,
हसु तुज़्या चेहऱ्यावरच ,
तुझीच लाडकी मी ,रूसून बसली तरी ,
कौतुक करून बाबा फक्त तूच समजावतोस ,
चेहऱ्यावरच्या हसुला रोज नव्याने फुलवतोस ,
तुज़्यावरच प्रेम कधीच व्यक्त झाल नाही।

बाबा ,
शब्द अडखळले , मुके होयचे ,
अव्यक्त मनाशी भांडत बसायचे ,

बाबा  ,
उद्या ,सासरी जाताना 
निरोप कसा घ्यावा तेच समजेना ,
डोळे दाटून येतील ,
पण तुज्यावरच प्रेम मुकच राहील। 
- साबळे क्षितिजा

Monday, December 2, 2019

swapn

Image result for swapn images in marathi
                   स्वप्न
         स्वप्न ! स्वप्न असतं !
         मनातलं अंगण असतं !
                  स्वप्नांच्या आकाशी 
                  स्वप्न माझं !
         पाखराच्या पंखाशी 
         स्वप्न माझं !
                   अन जगाशी झगडणार 
                   स्वप्न माझं !
               
                  - क्षितिजा  साबळे 

अहंकार

  तू जाणलेला शब्द नवा  अहंकाराचा पहारा त्याला  परी तो शब्द सारखा  शब्दाचा अर्थ शब्दातच राहिला              -   साबळे क्षितिजा