गरिबाचं गाणं
परिस्थितीनं शिकवावंमाणुसकीचं नातं
कधीतरी ऐकून बघ
गरिबाचं गाणं
तूच तुझे वेचलेले शब्द
अस्पष्ट भावना अन अस्पष्ट शब्द
अस्पष्ट शब्दातलं जगणं
कधीतरी जगून बघ
अंधारातल्या उजेडासाठी
शोधतोय तो दिवा
अस्पष्ट अंधाराशी
नातं तोडतोय
कधीतरी दिव्याची
गोष्ट जाणून बघ
परिस्थितीनं शिकवावं
माणुसकीचं नातं
कधीतरी ऐकून बघ
गरिबाचं गाणं
--साबळे क्षितिजा
